अरुण भोई द्वारा गुन्हे कथा मालिका
नमस्कार वाचक रसिकहो. हि दिपावली आपणा सर्वांना सुख, समाधान, आरोग्यदायी व समृद्धीची जावो. मित्रहो दरवर्षी चोखंदळ वाचक दिवाळी अंकांची वाट पहात असतात आणि वाचतात. दिवाळीच्या फराळाप्रमाणे विविध प्रकारच्या कथा, कादंबऱ्या, कविता, व्यंगचित्रे इ.चा आनंद घेतात.
अरुण भोई आता वाचकांच्या जिज्ञासा पूर्तीसाठी सत्य घटनांवर आधारित गुन्हेगारी विश्वातील, जगभरातील गाजलेले मती शून्य करणारे गुंतागुंतीचे गुन्हे, त्यांचा तपास व न्यायदान याचा भंडारा आपणा समोर उघडत आहे. साध्या, सोप्या मराठी भाषेत आपल्या वाचनासाठी मांडत आहे. वाचकांसाठी एकानंतर एक अशा अनेक गुन्हे कथा, गुन्हे करण्याची गुन्हेगाराची पद्धती, गुन्हे तपास, त्यास न्यायसहायक विज्ञानाची जोड व न्यायदान प्रक्रिया याविषयीचे ज्ञान समृद्ध करतील.
यास वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळेल यात शंका घेण्याचे कारण नाही.
अरुण भोई: फॉरेन्सिक एक्स्पर्ट
Written by accurateforensics
Leave a comment